अमेरिकेतील चिनी दूतावासावर हल्ला! हल्लेखोराला कंठस्नान

सॅन फ्रान्सिस्को- अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को येथील चिनी वाणिज्य दूतावासावर एका अज्ञाताने हल्ला केला. हल्लेखोर भरधाव वेगात कार घेऊन दूतावासात घुसला. यामुळे मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच सॅन फ्रान्सिस्को पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हल्लेखोरावर गोळीबार केला. यात तो जागीच ठार झाला.
या घटनेमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. काही दिवसांपूर्वीच न्यूयॉर्कमध्ये एका आरोपीने निष्पाप लोकांवर गोळीबार केला होता. त्यानंतर आता सॅन फ्रान्सिस्कोतील या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोराने भरधाव कार दूतावासाच्या आत आणल्याने दरवाजा आणि अन्य काही वस्तूंचे मोठे नुकसान झाले. तसेच यात काही लोक जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top