अलाहाबाद ऐवजी उत्तर प्रदेश! उच्च न्यायालय नावासाठी याचिका

अलाहाबाद- अलाहाबाद उच्च न्यायालयाचे नाव हे शहरांच्या नावानुसार उच्च न्यायालयांचे नाव असावे या ब्रिटिशांच्या धोरणानुसार असून ते बदलून आता उच्च न्यायालय उत्तर प्रदेश असे करावे अशी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

लखनऊ इथ राहणारे अॅडव्होकेट दीपांकर कुमार यांनी ही याचिका दाखल केली असून आपल्या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारच्या ब्रिटिशांच्या चालीरिती स्वतंत्र भारतात सुरु ठेवायला नको. भारताने संविधानाचा स्विकार केलेला असून ब्रिटिश सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार या देशाचे काम चालत नाही. घटना स्विकारल्यानंतर भारत सरकारने अशा प्रकारची नावे बदलायला हवीत.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अलाहाबाद उच्च न्यायालयाचे नाव बदलून ते उच्च न्यायालय उत्तर प्रदेश असे ठेवण्याच्या सूचना द्याव्यात व यापुढील सर्व संबंधित पत्रव्यवहार, आदेश व इतर कागदपत्रांवर त्यांची नोंद करावी असेही त्यांनी या याचिकेत म्हटले आहे. अशाची आशयाची एक याचिका २०२१ पासून उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top