अहमदनगर – प्रवरा साखर कारखान्याच्या वीज निर्मिती प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. सतर्कता दाखवत कामगार बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यानी घटनास्थळावर धाव घेऊन शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. सध्या हा कारखाना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली आहे. कारखान्यात वीज निर्मितीचा हा प्रकल्प गॅमन इंडीया या खासगी कंपनीचा आहे. भर ऊन्हात आग लागल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. कामगार बाहेर पडल्याने जिवीतहानी झाली नाही. जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीमुळे कारखान्यातील सर्व कामकाज बंद करण्यात आलं आहे.ही आग नेमकी कशामुळे लागली याची आता चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.