रेक्याविक -युरोपमधील आइसलँडमध्ये डिसेंबर महिन्यापासून ज्वालामुखींचा सातत्याने उद्रेक होत आहे. देशात बऱ्याच ठिकाणी जमीन दुभंगली असून, मोठ्या प्रमाणात लाव्हा आणि मॅग्मा रस बाहेर येत आहे. येथील इतर ज्वालामुखींवर आता शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत. ज्वालामुखींच्या स्फोटामुळे सरकारने देशात आणीबाणी लागू केली आहे.
लॅन्सेस्टर विद्यापीठातील डॉ. डेव्ह मॅकगार्व्हे या ज्वालामुखीची माहिती देताना म्हणाले की,गेल्या वेळी असे उद्रेक झाले, तेव्हा त्यांची सुरुवात पूर्व बाजूकडून झाली आणि पुढे ते पश्चिमेकडे सरकत गेले. २०२१ सालापासूनच उद्रेकांचे चक्र सुरू झाले होते. सध्या झालेले उद्रेक हे पश्चिमेकडे झाले आहेत. त्यामुळे याबाबत कोणताही अंदाज बांधणे अवघड होत आहे.हे उद्रेक आधीच्या कोणत्याही निसर्गनियमांमध्ये बसत नाहीत. त्यामुळे जमिनीखाली किती लाव्हा रस आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे. हे चक्र कधी थांबेल याची आम्हाला सध्या कल्पना नाही.