मुंबई – भारत फोर्ज कंपनीची मालकी असलेल्या कल्याणी कुटुंबात आईच्या मृत्यूपत्रावरून वाद निर्माण झाला आहे. भारत फोर्जचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ बंधू बाबा कल्याणी यांनी आपल्या दिवंगत मातोश्री सुलोचना यांनी २०१२ मध्ये केलेले मृत्यूपत्र पुणे दिवाणी न्यायालयात सादर केले आहे. या मृत्यूपत्राला बाबा यांचे कनिष्ठ बंधु गौरीशंकर कल्याणी यांनी आव्हान दिले आहे.
गौरीशंकर कल्याणी यांनी दिवंगत मातोश्री सुलोचना यांनी सन २०२२ मध्ये केलेले मृत्यूपत्र न्यायालयात सादर केले आहे. २०२२ मधील हे मृत्यूपत्र सुलोचना कल्याणी यांनी आपल्या मृत्यूच्या काही महिने आधी केले होते. त्यामुळे तेच ग्राह्य धरले जावे. त्याआधीचे म्हणजेच २०१२ सालचे बाबा कल्याणी यांनी सादर केलेले मृत्यूपत्र ग्राह्य धरले जाऊ नये,असा दावा गौरीशंकर यांनी केला आहे.