आता पोस्टाने मिळणार घरपोच हापूस आंबा !

मुंबई – कोकणातील हापूस आंब्यांना देशातच नाही तर विदेशातही मोठी मागणी असते.परंतु हाच हापूस आंबा आता भारतीय डाक विभागाने घरपोच देण्याची सेवा सुरू केली आहे.यामध्ये ग्राहकांना अस्सल सेंद्रिय हापूस आंबे घरपोच मिळणार आहे. भारतीय पोस्ट विभागाने उत्पादक ते ग्राहक अशी ही सेवा सुरू केली आहे. त्यात देवगडचा अस्सल हापूस मिळणार आहे.सध्या ही सुविधा राज्यातील काही निवडक टपाल कार्यालयात सुरु केली आहे.

ग्राहकांना आगाऊ नोंदणी करुन आंबा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे. पेटी घरपोच हवी असल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.नोंदणी केल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या आंबा पेटीच्या डिलिव्हरीची तारीख कळविण्यात येईल. पोस्ट विभागाने कोकणातील देवगड तालुक्यातील दहिबाव येथील शेतकरी श्रीधर ओगले यांच्याशी करार केला आहे. त्यांच्या आंबा बागेतील आंब्यास जीआय मानांकन मिळाले आहे.कोणत्याही रासायनिक पद्धतीच्या वापराशिवाय नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला आंबा ते देणार आहेत.रत्नागिरी पोस्ट कार्यालयामार्फत पुणे, मुंबईत सुद्धा आंबा मिळणार आहे.त्यासाठी काही दिवसांत आंब्याच्या बुकिंगची योजना सुरू केली जाईल.त्यासाठी रत्नागिरी पोस्ट कार्यालयामार्फत नोंदणी करावयाची पोस्ट कार्यालये सुद्धा जाहीर होतील.ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था सध्या केलेली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top