आता लायन बुक ॲप प्रकरणी बॉलिवूड कलाकार ईडीच्या रडारवर

मुंबई- महादेव बुक ॲपनंतर लायन बुक ॲप हे ईडीच्या रडारवर आले आहे. लायन बुक ॲपच्या माध्यमातून देश परदेशात मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजी सुरू आहे. भारतासह पाकिस्तानमध्ये या ॲपच्या माध्यमातून सट्टेबाजी चालत असल्याचा संशय सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) व्यक्त केला आहे. महादेव ॲप कंपनीच्या मालकीचे लायन बुक हे नवे ॲप आता चर्चेत आले आहे. महादेव ॲपनंतर आता हे नवे ॲप, त्यात झालेले व्यवहार, त्यातील बॉलीवूडचा सहभाग आदी गोष्टींचा तपास आता ईडीच्या अजेंड्यावर आला आहे. या नव्या ॲपच्या प्रमोशनदेखील बॉलीवूडमधील काही प्रसिद्ध कलाकारांनी केले. या प्रमोशनकरिता त्यांनी कोटींच्या घरात मानधन स्वीकारले आहे.त्यामुळे बॉलिवूडचे हे कलाकार आता ईडीच्या रडारवर आले आहेत.
दीप्ती साधवानी, रफ्तार, सोनू सुद, सुनील शेट्टी, संजय दत्त, हार्डी संधू, सुनील ग्रोव्हर, रश्मिका मंधाना, सोनाक्षी सिन्हा, गुरु रंधावा, टायगर श्रॉफ, सारा अली खान, सुखविंदर सिंग, कपिल शर्मा, मलायका अरोरा, डिजे चेतस, नोरा फतेही, नुसरत भरुचा, मौनी रॉय, अमित त्रिवेदी, सोफी चौधरी, आफताब शिवदासानी, डेझी शाह, नर्गिस फाकरी, उर्वशी रौतेला, इशिता राज, नेहा शर्मा, स्नेहा उलाल, प्रीती जांगियानी, शमिता शेट्टी, एलनाझ, सोनाली सहगल, इशिता दत्ता, ज्योर्जिओ अँड्रियानी हे कालाकार ईडीच्या रडारवर आहेत. लायन बुक ॲपची सक्सेस पार्टी गेल्या वर्षी २० सप्टेंबरला दुबईतील एका हॉटेलमध्ये झाली होती. या पार्टीसाठी अनेक बॉलीवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली होती. संजय दत्त, सुनील शेट्टी, सोफी चौधरी, स्नेह उलाल, डेजी शहा आणि जॉर्जिया एड्रीयानी असे अनेक कलाकार लायन बुक ॲपच्या सक्सेस पार्टीला उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top