चेन्नई – तामिळनाडूचे खासदार गणेशमूर्ती यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ड्रविड मुन्नेत्र कझगमचे पक्षाचे नेते, खासदार गणेशमूर्ती यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी खासदार गणेशमूर्ती यांनी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, तामिळनाडू इरोड लोकसभा मतदारारसंघात द्रमुक पक्षाने गणेशमूर्ती यांचे तिकीट कापले होते. त्यामुळे त्यांनी नैराश्यातून
आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. गणेशमूर्ती यांचे पार्थिव इरोडच्या पेरियार नगरमधील घरी आणण्यात आले.
गणेशमूर्ती यांनी तीन वेळा संसदेत निवडून गेलेले गणेशमूर्ती यांनी एमडीएमके पक्षातील अनेक पदे भूषवली होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते तामिळनाडूमधील इरोड या लोकसभा मतदारसंघातून पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. या मतदारसंघात डीएमके पक्षाने उमेदवार उभा केला तर तिरुचीमधील जागा एमडीएमके यांना देऊ केली. एमडीएमके पक्षाचे महासचिव वायको यांचा मुलगा दुरई वायको यांना उमेदवारी जाहीर केली होती.