नवी दिल्ली- एका हंगामातील सर्व लीग सामने खेळण्यास आयपीएलमधील खेळाडूला एक कोटी आणि पाच लाख रुपयांचा बोनस मिळणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही घोषणा केली आहे. जय शहा यांनी सोशल मीडियावर म्हटले की, आयपीएलमधील प्रत्येक संघाला सामन्याचे शुल्क देण्यासाठी १२ कोटी आणि ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूला ७.५० लाख रुपयांचे सामना शुल्क मिळणार आहे. एक कोटी रुपयांचा बोनस वेगळा असणार आहे.