इंडिया आघाडीने लोकसभेत वंचितच्या मतांचा वापर केला! प्रकाश आंबडेकरांचा आरोप

मुंबई- दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम भाजपाशी लढण्यास सक्षम विरोधक आहेत, असे इंडिया आघाडीने मतदारांना पटवून दिले. मात्र, प्रत्यक्षात या राजकीय पक्षांना केवळ स्वत:ला वाचवायचे होते आणि यासाठी त्यांनी वंचितच्या मतांचा वापर केला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला मतदारसंघात भाजपाचे अनुप धोत्रे यांनी प्रकाश आंबेडकरांचा पराभव केला. या पराभवनंतर वंचित बहुजन आघाडीच्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीवर आरोप केले आहेत.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारला आहे. आम्ही निराश झालो आहोत पण, आशा सोडलेली नाही. आम्ही आमच्या अपयशाचे आत्मपरीक्षण करू. महाविकास आघाडीतील काही घटकांनी जाणीवपूर्वक वंचितला आघाडीत सामावून घेतले नाही. आम्हाला बैठकांसाठी आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, ते सर्व मीडिया आणि मतदारांसाठी होते. आम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलो आणि मतदारांना आमचा झालेला अपमान आणि आमच्या पक्षाप्रती मविआची संकुचित वृत्ती पटवून देण्यात अपयशी ठरलो. वंचितनेच आंबेडकरी चळवळ आणि संविधान वाचवण्याच्या लढ्याचे नेतृत्व केले होते. जेव्हा या प्रमुख पक्षांचे सदस्य हिंदुत्वात गुंतले होते आणि एनडीए १ आणि २ च्या सरकारच्या काळात राज्यघटनेत करण्यात येत असलेल्या सुधारणांवर मौन बाळगून होते. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसोबत लढण्याचा अजेंडा नसल्याचे इंडिया आघाडीच्या लक्षात आल्यावर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वापर केला. दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम भाजपाशी लढण्यास सक्षम विरोधक आहेत, असे इंडिया आघाडीने मतदारांना पटवून दिले. मात्र, प्रत्यक्षात या राजकीय पक्षांना केवळ स्वत:ला वाचवायचे होते आणि यासाठी त्यांनी वंचितच्या मतांचा वापर केला
पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, या पक्षांना संविधान वाचवायचे असते, सामाजिक दृष्ट्या वंचित व शोषितांसाठी लढायचे असते, तर वंचित आघाडी स्थापन करण्याची गरजच पडली नसती. इंडिया आघाडीतील पक्षांनी दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लीम यांची मते घेतली आहेत. शेवटच्या बैठकीत महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला २ जागा देत असल्याचे सांगितले. त्यातील एक जागा अकोला आणि दुसरी जागा उत्तर मुंबई होती. मविआचे नेते माध्यमाशी बोलताना या जागांचा आकडा ४ ते ६ सांगायचे आणि ते ज्या जागांचा उल्लेख करायचे त्यात आम्हाला २०१९ मधे एक लाखाच्या वर मतदान मिळालेली एकही जागा नसायची. यावरून लक्षात आलेली गोष्ट म्हणजे उत्तर मुंबईची न जिंकता येणारी जागा होती, तर अकोल्याच्या जागेत कधीही गेम होऊ शकतो. इंडिया आघाडी बरोबर जाऊन पडणे आणि स्वत:च्या ताकदीवर लढणे यात फरक आहे. महाविकास आघाडीने एवढे अपमानित करुनही आम्ही सहभागी होण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केला. यासाठीचे पहिले पाऊलही वंचित बहुजन आघाडीनेच टाकले. जे गेले अनेक महिने दुर्लक्षित केले गेले. महाविकास आघाडीने काही ठराविक बैठकींना आम्हाला बोलावले. बाकीच्या बैठकांना बोलावले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top