तेहरान
इस्त्रायल आणि पॅलेस्टीन युद्धाची दाहकता अजूनही शमली नसतानाच आता इराणने इस्रायलवर प्रथमच थेट ड्रोनद्वारे शेकडो क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात ७ वर्षांची मुलगी जखमी झाली असून इस्त्रायली लष्करी यंत्रणाचे किरकोळ नुकसान झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवरून इराणच्या हल्ल्याचा निषेध केला जात असताना इराणने मात्र आणखी तीव्र हल्ला करण्याचा इशारा दिला. काही दिवसांपूर्वी सीइराणच्या दूतावासावर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर
तेल अवीव आणि पश्चिम जेरुसलेमसह संपूर्ण इस्रायलमधील शहरांमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजले गेले. इराणकडून इस्रायलवर ड्रोन हल्ले करण्यात आल्याचा दावा इस्रायल लष्कराचे प्रवक्ते रेअर अॅडमिरल डॅनिअल हगेरी यांनी केला. अनेक क्षेपणास्रे इस्रायलच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्याच्या आधीच उद्ध्वस्त करण्यात आल्याचेही हगेरी म्हणाले. यात १०हून अधिक क्रूज क्षेपणास्त्रांचा समावेश होता. इराणने संयुक्त राष्ट्रांना निवेदन दिले असून त्यात अधिक भीषण हल्ला करण्याचा उल्लेख करत इराणने सांगितले की,“जर इस्रायलने इराणविरोधात कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई केली, तर आता त्याला आमचे उत्तर अधिक भीषण आणि संहारक असेल. इराणने आज केलेला हल्ला हा संयुक्त राष्ट्रांच्या कलम ५१ मध्ये नमूद केलेल्या स्वसंरक्षणाच्या अधिकारांतर्गत केला आहे. १ एप्रिल २०२४ रोजी इस्रायलने सीरियामधील इराणच्या दूतावासावर हल्ला केला. इस्रायलच्या या अशा आक्रमक धोरणाचा प्रतिकार करण्यासाठी इराणने हल्ला केला.