इराण आणि इस्रायलला प्रवास करणे टाळावे

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचा सल्ला

नवी दिल्ली

इस्रायल आणि हमास यांच्यामधील युध्द दिवसेंदिवस भीषण होत आहे. इराण कधीही इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इराण आणि इस्रायल या देशांमध्ये जाणे टाळावे, असा सल्ला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या एक्स अकाऊंटवर काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यासोबतच अमेरिकेसह काही देशांनी आपापल्या नागरिकांना इराण आणि इस्रायलचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. म्यानमारच्या सित्वे शहरातील सुरक्षाविषयक परिस्थिती अस्थिर असल्याने तेथील वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना यांगून शहरात हलवण्यात आले आहे.

इराण आणि इस्रायल या दोन्ही देशामंधील परिस्थिती अत्यंत तणावाची आहे. पुढील ४८ तास महत्त्वाचे असून खबरदारी घ्यावी, असे आवाहन देखील परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. पराराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या एक्स अकाऊंटवर म्हटले आहे की, ‘इराण आणि इस्रायल प्रदेशातील परिस्थिती लक्षात घेता, सर्व भारतीयांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराण किंवा इस्रायलला प्रवास न करण्याचा सल्ला आहे. जे सध्या इराण किंवा इस्रायलमध्ये वास्तव्य करत आहेत त्यांनी तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधावा आणि स्वतःची नोंदणी करावी. त्यांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. त्यांनी गरज असेल तरच बाहेर पडण्याची विनंती केली जात आहे.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top