इराण – इस्त्रायलमधील युद्धामुळे शेअर बाजारात मोठी घसरण

मुंबई

इराण – इस्त्रायलमधील युद्धसदृश्य स्थितीमुळे आज भारतीय शेअर बाजाराचा मूड बिघडला. इराण – इस्त्रायलमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती व महागाईत मोठी वाढ होण्याची भीती असल्यामुळे बाजारात मोठी पडझड झाली. शुक्रवारी शेअर बाजार १ टक्क्यांनी घसरल्यानंतर आज बाजार उघडताच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (बीएसई) सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली.

सेन्सेक्स ९०० हून अधिक अंकांनी घसरून ७३,३१५.१६ अंकावर उघडला, तर निफ्टीने २२,३३९.०५ अंकावर व्यापार सुरू केला. बीएसईच्या ३० समभागांपैकी केवळ ४ शेअरमध्ये तेजी नोंदवली गेली, तर उर्वरित सर्व २६ शेअर घसरले. सुरुवातीच्या सत्रात टाटा मोटरच्या शेअरमध्ये सर्वाधिक २.४१% पडझड झाली. आज एनएसईवर २१७१ समभागांची खरेदी-विक्री झाली, त्यापैकी फक्त १३५ समभागांमध्ये तेजी दिसून आली, तर उर्वरित १९७९ शेअरमध्ये मोठी घसरण झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top