गाझा
इस्रायल-हमास युद्धात गुरुवारी इस्रायलच्या रणगाड्यांनी आपल्याच सैनिकांना उडवले. यात ५ सैनिक ठार झाले, तर ७ जण जखमी झाले. ही घटना उत्तर गाझामध्ये घडली. याबाबत इस्रायलच्या लष्करी अधिका-यांनी माहिती दिली. त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले.
रॉय बीट याकोव्ह (२२), इलन कोहेन (२०), बेल्झालेल डेव्हिड शाशुआ (२१) गिलाउ आर्येह बोइम (२२), डॅनियल केमू (२०) अशी मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांची नावे आहेत. तर सात जवान जखमी असून त्यातील तीन जण गंभीर आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.