इस्रायलच्या स्देरोत शहरातील २० हजार नागरिकांचे स्थलांतर

तेल अवीव- गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी शहरापासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या इराकच्या स्देरोत शहरातील नागरिकांनी आपले स्थलांतर सुरू केले आहे.आतापर्यंत २० हजार नागरिक घरे सोडून स्थलांतरित झाली आहेत. इस्रायलच्या इतिहासात पहिल्यांदाच हे शहर रिकामे झाले आहे.

स्देरोत शहरावर हमासने आतापर्यंत ७० रॉकेटचा मारा केला आहे. या शहराचे उपमहापौर इलाद कालिमी यांनी शहराची सद्यस्थिती सांगताना म्हटले आहे की, या शहरात लोकांना राहण्यासारखी परिस्थिती उरलेली नाही. आणखी काही दिवसांत उर्वरित लोक शहर सोडतील. केवळ ३ टक्के नागरिक या शहरात राहण्याची शक्यता आहे. महापौर दाविदी यांनी म्हटले आहे की, आम्ही मागे राहिलेल्या रहिवाशांची किमान आठवडाभर हॉटेलमध्ये राहण्याची सोय करू शकतो..गाझा पट्टीतील सुमारे दहा लाख लोकांनी आतापर्यंत आपला जीव वाचविण्यासाठी स्थलांतर केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top