इस्रायलमधून चौथे विमान भारतीयांना घेऊन परतले

नवी दिल्ली : ऑपरेशन अजय अंतर्गत भारताचे चौथे विमान भारतीय नागरिकांना घेऊन इस्रायलहून दिल्ली विमानतळावर पोहोचले. ऑपरेशन अजयचे चौथे विमान शनिवारी रात्री उशिरा इस्रायलमधील तेल अवीव येथून भारतासाठी रवाना झाले होते. चौथ्या विमानामध्ये २७४ भारतीय नागरिक होते, त्यांना भारतात आणण्यात आले आहे. तत्पूर्वी, या ऑपरेशनचे तिसरे विमान शनिवारी रात्री उशिरा इस्रायलहून दिल्ली विमानतळावर पोहोचले होते. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एक्स वर सांगितले की, इस्रायलहून भारतासाठी रवाना होणारी शनिवारी ही एका दिवसातील दुसरी फ्लाइट होती. या विमानात १९७ भारतीय नागरिक होते, त्यांना इस्रायलमधून सुखरूप परत आणण्यात आले. ऑपरेशन अजय अंतर्गत आतापर्यंत ६४४ लोकांना भारतात आणण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top