इस्रायल -हमास युध्दाप्रकरणी इलॉन मस्क यांना समन्स

वॉशिंग्टन

इस्रायल आणि हमास यांच्यामधील संघर्ष अजूनही सुरूच आहे. या युध्दासंदर्भातील अनेक व्हिडीओ एक्स या सोशल मीडिया अॅपवर प्रसिध्द होत आहेत. पण हे व्हिडीओ बनावट असल्याचे युरोपिय युनियनचे म्हणणे आहे. याच प्रकरणी युरोपिय युनियनने टेस्ला आणि एक्स अॅपचे मालक एलन मस्क यांना समन्स बजावले आहे. ऑस्ट्रेलियाच्या इसेफ्टी कमिशनने इलॉन मस्क यांच्या मालकीच्या एक्स अॅपला ३८ लाख ६ हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे. बाल शोषणाच्या तपासात सहकार्य न केल्याने एक्सवर ही कारवाई करण्यात आली आहे.

इस्रायल -पॅलेस्टाईन संघर्ष शिगेला पोहोचला आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने केलेल्या हल्ल्यांना इस्रायलने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान,इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ‘कोणताही युद्धविराम नाही’ असे विधान करत त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून या संदर्भातील पोस्ट केली आहे. अनेक देशांच्या प्रमुखांनी इस्रायल -पॅलेस्टाईन पाठिंबा दिला आहे. या संदर्भातील अनेक वृत्त सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. याच बनावट वृत्तांसंदर्भातील कारवाई करत युरोपिय युनियनने इलॉन मस्क यांना समन्स बजावले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top