Home / News / उजनी धरण १०० टक्के भरले नदीकाठच्या गावांना इशारा

उजनी धरण १०० टक्के भरले नदीकाठच्या गावांना इशारा

सोलापूर – मुसळधार पावसामुळे पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातून...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

सोलापूर – मुसळधार पावसामुळे पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीला पूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे . उजनी धरणातील पाणीसाठ्यावर नियंत्रण करण्याचा भाग म्हणून धरणातून भीमेच्या पात्रासह धरणाच्या डाव्या- उजव्या कालव्यात आणि भीमा-सीना जोडकालव्यात पाणी सोडण्यात येत आहे.

Web Title:
संबंधित बातम्या