उड्डाणादरम्यान पक्षी धडकल्याने लढाऊ विमान जेट निकामी

सेऊल –

जगातील सर्वात महागडे आणि आधुनिक लढाऊ विमान एफ-३५ ए स्टेल्थ या फायटर जेटला उड्डाणादरम्यान एका पक्षी धडकला. यामुळे या लढाऊ विमानाचे मोठे नुकसान झाले असून, हे विमान या घटनेनंतर निकामी झाले. गेल्या वर्षी देखील एका पक्षाने जेट विमानाला धडक दिली होती. त्यावेळी या विमानाच्या दुरुस्तीसाठी अंदाजे १४० अब्ज वॉन म्हणजेच ९०० कोटी रुपयांचा खर्च असल्याचे लॉकहीड मार्टिन या विमाननिर्मिती करणाऱ्या कंपनीने सांगितले. हा खर्च जेटच्या खरेदी किंमतीपेक्षा म्हणजेच ७५० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाच्या हवाई दलाने लढाऊ विमान एफ-३५ए स्टेल्थ फायटर जेटला निवृत्त करण्याचा निर्णय घेतला.

जानेवारी २०२२ मध्ये एका प्रशिक्षणादरम्यान एफ-३५ जेट विमानाला एका गरुडाने धडक दिली. या गरुडाचे वजन सुमारे १० किलो असल्याचे दक्षिण कोरियाच्या हवाई दलाने सांगितले होते. या अपघातामुळे वैमानिकाला विमानाचे लँडिग करावे लागले. लॉकहीड मार्टिन या विमान निर्मिती करणाऱ्या कंपनीने सांगितले की, या अपघातामुळे विमानातील सुमारे ३०० महागड्या उपकरणांचे नुकसान झाले. कंपनीने या जेटच्या दुरुस्तीचा खर्च अंदाजे १४० अब्ज वॉन म्हणजेच ९०० कोटी रुपये असल्याचे सांगितले. हा खर्च जेटच्या निमिर्तीपेक्षा अधिक असल्याने हवाई दलाने एफ-३५ जेट विमानाला निवृत्त करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top