उत्तराखंडच्या उत्तरकाशीत भूकंपाचा सौम्य धक्का

डेहराडून :

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये आज सकाळी ८:३० वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.८ इतकी मोजली गेली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून ५ किलोमीटर खाली होते.

भूकंपशास्त्रज्ञांच्या मते, उत्तराखंड हे भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील राज्य आहे. भूकंप क्षेत्राच्या आधारावर भारताची विभागणी झोन-२, झोन-३, झोन-४ आणि झोन-५ मध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार उत्तराखंडमधील बहुतांश भाग भूकंपाच्या दृष्टीने झोन ४ आणि ५ मध्ये आहेत. त्यामुळेच इथे भूकंपाच्या घटना वारंवार घडत असतात. तीन महिन्यांपूर्वी ऑक्टोबरमध्ये ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top