उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का

डेहराडून

उत्तराखंडातील पिथौरागढमध्ये आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ४.० रिश्टर स्केल इतकी होती, अशी माहिती राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने दिली आहे. या भूकंपात कोणतीही जिवीत हानी आणि वित्तहानी झाली नाही. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. या भूकंपाचा केंद्र पिथौरागढच्या ४८ किमी ईशान्येकडे ५ किमी खोलीवर होता. गेल्या काही दिवसांत या भागात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधीही ५ ऑक्टोबरला उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top