उत्तर प्रदेशातील पोलिस भरती परीक्षा विरोधकांनी आवाज उठवल्याने रद्द

लखनऊ- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १७ व १८ रोजी झालेली पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा-२०२४ रद्द केली आहे. ही परीक्षा पुढील सहा महिन्यात घेण्यात येणार आहे. या परीक्षेतील पेपरफुटीचा मुद्दा विरोधी पक्षाने उठवला होता. त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव व काँग्रसचे राहुल गांधी यांनीही या परिक्षेतील गैरप्रकाराबाबत आवाज उठवला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या परीक्षेच्या संदर्भात एसटीएफचा सध्या सुरू असलेला तपास आणि आतापर्यंत केलेल्या कारवाईचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी शनिवारी हा निर्णय घेतला. युवकांच्या कष्टांशी खेळणे आणि परीक्षेच्या मुल्यांशी तडजोड करणे हे मान्य करता येणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. अशा बेशिस्त घटकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कोणत्याही स्तरावरील निष्काळजीपणाविरुद्ध एफआयआर नोंदवून आगाऊ कायदेशीर कारवाई सुनिश्चित करण्याच्या सूचनाही सरकारने भरती मंडळाला दिल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी एसटीएफकडून करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, दोषी आढळणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सहा महिन्यांत पूर्ण अचूकतेने परीक्षा पुन्हा घेण्याच्या आणि उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाच्या सेवेद्वारे उमेदवारांना मोफत प्रवास सुविधा देण्याच्या सूचनाही सरकारने दिल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top