उत्तर प्रदेशात १० टनाचा मोबाईल टॉवरच चोरला!*९ महिन्यांनी तक्रार दाखल

लखनौ :

उत्तर प्रदेशच्या कौशंबी जिल्ह्यातील उज्जैनी गावातून १० टन वजनाचा मोबाइल टॉवर चोरीला गेला. चोरीच्या घटनेनंतर ९ महिन्यांनी संबंधित कंपनीने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार हा टॉवर ३१ मार्च २०२३ रोजी चोरीला गेला असून पोलिसांनी आयपीसी कलम ३७९ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

उज्जैनी गावातून केवळ मोबाइल टॉवरच नाही तर ८ लाखांपेक्षा अधिक किमतीची विदयुत उपकरणे चोरीला गेली. याप्रकरणी संदीपान घाट पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून जमीनमालक आणि स्थानिक नागरिकांचा जबाब नोंदवून घेतला. संबंधित टॉवर कंपनीचे अधिकारी राजेश कुमार यादव यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘त्यांच्या कंपनीने यावर्षी जानेवारी महिन्यात कौशंबी जिल्ह्याच्या उज्जैनी गावातील शेतकरी उबिद उल्लाह यांच्या शेतात टॉवर बसवला. ३१ मार्च २०२३ रोजी पाहणीसाठी गेले असता टॉवर आणि इतर विद्युत उपकरणांची चोरी झाल्याचे समजले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top