उद्धव ठाकरेंच्या ठाण्यात १६ नोव्हेंबरला तीन सभा

ठाणे – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाणे जिल्ह्यात उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १६ नोव्हेंबर रोजी ३ जाहीर सभा घेतील. या सभा ठाणे, कल्याण आणि डोंबिवली शहरात होणार आहेत. डोंबिवली, कल्याण ग्रामीण या दोन मतदारसंघांसाठी डोंबिवलीत दुपारी एक वाजता पहिली सभा होणार आहे. कल्याण पूर्व, अंबरनाथ, कल्याण पश्चिम या तीन मतदारसंघांसाठी कल्याण पूर्वेत सायंकाळी ५ वाजता सभा होणार आहे. तर, ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, ऐरोली या चार मतदारसंघांसाठी ठाणे शहरात सायंकाळी ७ वाजता सभा होणार आहे.