मुंबई- भारतातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांनी नुकतीच उबेरचे सीईओ दारा खोसरोशाही यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही व्यावसायिकांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच भारताच्या आर्थिक प्रगतीबाबत आणि भारतीय उपखंडातील योजनांवरही उबेरचे सीईओ आणि अदानी समूहाचे अध्यक्ष यांच्यात चर्चा झाली.
गौतम अदानी यांनी यावेळी भारतीय कारचालकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि ईलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिल्याबद्दल उबेरचे कौतुक केले. उबेरचे सीईओ दारा खोसरोशाही हे सध्या भारतात आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नाश्ता करताना गौतम अदानी सोबत झालेली भेट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, ” ही एक अप्रतिम भेट होती. त्यांना अदानी ग्रुपसोबत काम करायचे असून त्यावर त्यांनी चर्चाही केली. गौतम अदानी यांनीही एक्सवरील या बैठकीबाबतचे त्यांचे अनुभव सांगितले. भविष्यात उबेरसोबत काम करायला आवडेल असे अदानी यांनी म्हटले आहे. कंपनीने भारतात चांगले काम केले आहे.