वॉशिंग्टन – अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांची स्पेसएक्स कंपनी आगामी दोन वर्षांत मंगळ ग्रहावर पाच अंतराळ यान पाठविणार आहे.या पाचही यानांचे मंगळावर यशस्वी अवतरण झाले तर पुढील चार वर्षांत मंगळावर अंतराळवीर पाठविण्याची कंपनीची योजना आहे.मस्क यांनी एक्स पोस्टमधून ही माहिती दिली.मंगळावर मानवविरहित यान पाठविण्याच्या पाच मोहिमांमध्ये थोडीशी जरी त्रुटी आढळली तरी मानवाला मंगळावर पाठविण्याची मोहीम पुढे ढकलण्यात येईल,असेही मस्क यांनी म्हटले आहे.
