उल्हासनगरमध्ये दंड थकवणाऱ्या ७२ रिक्षांची यादी जाहीर

ठाणे- वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि त्यासाठी ठोठावण्यात आलेली दंडात्मक रक्कम थकवणाऱ्या ७२ रिक्षाचालकांच्या रिक्षा नंबरची यादी उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी वाहतूक शाखेकडून जाहिर करण्यात आली आहे. हा दंड बऱ्याच काळापासून थकीत आहे. हे दंड वेळेत न भरल्यास या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईअंतर्गत रिक्षाचा परवाना आणि नोंदणी रद्द करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे.
उल्हासनगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय गायकवाड आणि विठ्ठलवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुधाकर खोत यांनी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये उल्हासनगर मधील ३० आणि विठ्ठलवाडीमधील ४२ अशा ७२ रिक्षांचा समावेश आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर ऑनलाईन पध्दतीने दंड ठोठावण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top