ऊसाचा गळीत हंगाम संपला मजूर निघाले परतीच्या वाटेवर

हातकणंगले -कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम संपत आल्याने ऊसतोड मजुर परतीच्या वाटेवर दिसत आहेत. मागील सहा महिन्यापासून पेटलेली धुरांडी आता बंद होत आहेत. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील बीड, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील ऊसतोड कामगार आपल्या कुटुंबीयांसह परतीच्या प्रवासाला लागले आहेत.

सातारा, सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातही ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून साखर कारखान्यांचे प्रमाणही जास्त आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १६ साखर कारखाने आहेत. त्यामध्ये वारणा, कुंभी अथणी, गुरुदत्त, गायकवाड, आजरा, गडहिंग्लज, बिद्री, भोगावती, पंचगंगा, घोरपडे,
दालमिया आदींचा समावेश आहे. या कारखान्यांत जाणारा ऊस परजिल्ह्यातील हे मजूर तोडून गाडीत भरत असतात. कारखानदार आणि मुकादम यांच्या माध्यमातून हे मजूर काम करतात. मात्र आता गळीत हंगाम संपल्याने त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top