एअर मार्शल अमर प्रीतहवाई दलाचे नवे प्रमुख

नवी दिल्ली – एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे ३० सप्टेंबर रोजी सेवेतून निवृत्त होणार आहेत सिंग सध्या हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत, ते ३० सप्टेंबर रोजी दुपारी दलाचा पदभार स्वीकारतील, असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. अमर प्रीतसिंग हे नॅशनल डिफेन्स अकादमी, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी असून एक पात्र फ्लाइंग इंस्ट्रक्टर आणि एक प्रायोगिक चाचणी पायलट आहेत. त्यांना विविध प्रकारच्या स्थिर आणि रोटरी-विंग विमानांवर पाच हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी ऑपरेशनल फायटर स्क्वॉड्रन आणि फ्रंटलाइन एअर बेसचे नेतृत्व केले आहे.