नवी दिल्ली – एक देश, एक निवडणूक हे केंद्र सरकारचे प्रस्तावित धोरण प्रत्यक्षात लागू करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्च स्तरीय समिती सोमवारी आजवर झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एक देश, एक निवडणूक या धोरणावर सविस्तर चर्चा करून या धोरणाची व्यवहार्यता तपासण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि एस ए बोबडे, दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश डी एन पटेल हे या समितीचे सदस्य आहेत. रामनाथ कोविंद यांनी सोमवारी या सदस्यांची बैठक घेऊन यावर किती काम करण्यात आले याचा आढावा घेतला