‘एक राष्ट्र, एक विद्यार्थी ओळखपत्र! केंद्र सरकारची नवी ‘अपार’ योजना

नवी दिल्ली- केंद्र सरकारने आता नागरिकांच्या आधार कार्ड योजनेच्या धर्तीवर देशातील विद्यार्थ्यांसाठी ‘एक राष्ट्र,एक विद्यार्थी ओळखपत्र ‘ म्हणजेच ‘अपार आयडी ‘ ही नवी योजना राबविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांंना त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि परीक्षेचे गुण हे डिजिटली साठवता येणार आहेत. ‘ द ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमीक अकाउंट रजिस्ट्री’ म्हणजेच ‘अपार ‘हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डला जोडले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीची माहिती एका क्षणात मिळणार आहे.तसेच त्यांच्या परीक्षांची गुणपत्रिका त्यात साठवता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी क्रिडा आणि अन्य क्षेत्रात केलेली कामगिरीही ‘डिजिलॉकर ‘ मध्ये साठवली जाईल.याचा उपयोग त्यांना उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी होणार आहे.केंद्रीय शिक्षण खात्याने याबाबतचे पत्र सर्व राज्यांना पाठवले आहे.राज्यांनी त्यांच्या सर्व शाळांमध्ये मुलांचे असे ‘अपार’ ओळखपत्र तयार करण्यासाठी पालकांची संमती घेण्यास सांगितले आहे.पुढील आठवड्यात शाळांनी तीन दिवसीय पालक-शिक्षक संघ यांची बैठक घेण्याची सूचनाही केंद्रीय शिक्षण खात्याने केली आहे.
देशातील ३० कोटी विद्यार्थ्यांपैकी निम्म्या मुलांची नोंद या ‘ अपार ‘ यंत्रणेत होऊ शकेल. हा विद्यार्थ्यांचा आयुष्यभराचा डाटा असेल.त्यांना आपली शैक्षणिक कागदपत्रे जवळ बाळगण्याची गरज नाही. ही सुविधा सर्व शाळा आणि व्यावसायिक अभ्यासक्रम असणार्‍या मंडळांमध्ये राबविली जाईल,अशी माहिती राष्ट्रीय शिक्षण तंत्रज्ञान फोरमचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top