एलसीए मार्क १ ए लढाऊ विमानांत नवीन स्वदेशी प्रणालीचा समावेश

नवी दिल्ली

आता भारतीय वायुसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. भारतीय हवाई दलाच्या स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) मार्क १ ए लढाऊ विमानांमध्ये ‘उत्तम’ हे रडार आणि ‘अंगद’ हा इलेक्‍ट्रॉनिक वॉरफेअर संच या दोन नवीन विकसित प्रणाली सामील होणार आहेत. यामुळे भारतीय बनावटीचे हलक्या वजनाचे लढाऊ विमान अधिक सुसज्ज यंत्रणांनी शत्रूला सामोरे जाण्यास सज्ज होईल. उत्तम अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक स्कॅन केलेले रडार आणि अंगद इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर संच या प्रणाली सध्या विकासित टप्प्यात आहेत. त्या लवकरच एलसीए मार्क १ ए लढाऊ विमानांमध्ये समाविष्ट केल्या जातील, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे.

केंद्र सरकार लष्करी सामर्थ्य वाढवण्यासोबतच त्यामध्ये स्वदेशीकरणाच्या दिशेनेही वाटचाल करण्याच्या प्रयत्नात आहे. लष्करात स्वदेशी बनावटीची विमाने आणि क्षेपणास्र सामील करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. उत्तम रडार आणि अंगद इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट स्वदेशी पद्धतीने विकसित केले जात असल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top