ऑस्ट्रेलियात अमेरिकेच्या दूतावासाची तोडफोड !

सिडनी – ऑस्ट्रेलियात पॅलेस्टिन समर्थक निदर्शकांकडून अमेरिकेच्या दूतावासाची तोडफोड करण्यात आली आहे.काल सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास उत्तर सिडनीतील या दूतावासाच्या काचा फोडण्यात आल्या.या दूतावासातील ९ हॉटेलात नव्याने बसवण्यात आलेल्या खिडक्यांच्या काचा गडद रंगाचा स्वेटशर्ट घातलेल्या एक व्यक्ती हातोड्याने फोडत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

दूतावासाबाहेरच्या प्रवेशद्वारावर पॅलेस्टिनी चिन्ह ग्राफिटीच्या माध्यमातून रंगवण्यात आले. न्यू साऊथ वेल्समध्ये सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे सोमवारी दूतावासाची इमारत बंद होती.मात्र आज मंगळवारी दूतावास पुन्हा उघडण्यात आला,असे वाणिज्य दूतावासाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅन्थनी अल्बानीज यांनी इस्रायल आणि पॅलेस्टिनी या दोन्ही बाजूंच्या निदर्शकांना तणाव कमी करण्यासाठी एकमेकांशी संवाद करण्याचे आवाहन केले आहे. ऑस्ट्रेलियातील अमेरिकेच्या दूतावासावर एप्रिल महिन्यातदेखील निदर्शकांनी ‘फ्री गाझा’ अशी अक्षरांची ग्राफिटी रंगवली होती. तर मेलबर्नमधील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासावर पॅलेस्टिन समर्थक निदर्शकांनी ३१ मे रोजी हल्ला करून तोडफोड केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top