मनाली – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून विजयी झालेल्या खासदार अभिनेत्री कंगना रनौट यांच्या निवडीला हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवरील सुनावणीप्रसंगी न्यायालयाने काल रनौट यांना नोटीस बजावली.
लायक राम नेगी असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. नेगी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. चुकीच्या पध्दतीने आपला अर्ज बाद ठरविला गेला,असा नेगी यांचा आरोप आहे.आपला अर्ज बाद ठरविल्याने कंगना यांचा विजय झाला,असा दावा करीत त्यांची निवड रद्द करावी,अशी मागणी नेगी यांनी केली आहे.
न्या. ज्योत्स्ना रेवाल यांच्या न्यायासनासमोर काल नेगी यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्याप्रसंगी न्यायालयाने रनौट यांना नोटीस बजावून २१ ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.