कणकवलीत अवकाळी पावसाची हजेरी

कणकवली –

कणकवली शहरासह वागदे, ओसरगाव, कसाल, ओरोस, कुडाळ आदी भागात आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस पडण्याची दाट शक्यता वाटत होती. अचानक पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाचा फटका विक्रेते तसेच व्यापाऱ्यांनाही काही प्रमाणात बसला. वातावरणातील बदलामुळे शेतकरी, बागायतदार चिंतेत असतानाच अवकाळी पाऊस पडत असल्याने त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. इथे गेला आठवडाभर उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठला होता. आज सकाळी पाऊस पडल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top