करंजा बंदर आणखी रखडणार! १३० कोटींच्या वाढीव निधीची गरज

उरण – मुंबईच्या ससून डॉक बंदरावरील भार कमी करण्यासाठी उभारल्या जाणार्‍या करंजा मच्छिमार बंदराचे काम आणखी रखडण्याची शक्यता आहे.कारण या बंदरात मासळी लिलाव शेडसाठी सुमारे १३० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.
मेरी टाईम बोर्डाने हे बंदर मत्स्यविभागाकडे वर्ग केले आहे आहे.मात्र, कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे या बंदराचे ८४ कोटींचे काम १५० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. केवळ कंत्राटदारामुळे हा ३५ कोटींचा वाढीव खर्च झाला आहे.रायगड जिल्ह्यासह राज्यातील हजारो व्यावसायिक आणि मच्छिमारांना या बंदराचा लाभ घेता येणार आहे.मात्र आधीच वाढीव खर्च झाला असताना आता आणखी सुमारे १३० कोटी रुपयांची आवश्यकता आहे.या बंदरात मासळी लिलावासाठी शेड बनवणे आणि इतर कामांसाठी हा १३० कोटी रुपयांच्या कामाचा आराखडा बनवण्यात आला आहे. हा प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठविण्यात आला आहे.त्यामुळे हे करंजा बंदर सुरू होण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे, अशी प्रतिक्रिया उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top