कराडपाठोपाठ मलकापूर नगरपालिकेवर प्रशासक

मलकापूर – सातारा जिल्ह्यातील कराड नगरपालिकेपाठोपाठ आता नजीकच्या मलकापूर नगरपालिकेवरही प्रशासकाची नियुक्ती केली जाणार आहे. या पालिकेचा पंचवार्षिक कार्यकाल १७ फेब्रुवारीला संपला आहे.

मलकापूर नगरपालिकेच्या विद्यमान सदस्यांचा कार्यकाल संपण्याआधी शेवटची सभा पालिकेच्या नवीन सभागृहात नुकतीच पार पडली. पाच वर्षांपूर्वीच या नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. पहिली पंचवार्षिक निवडणूक जानेवारी २०१९ मध्ये पार पडली होती. यामध्ये १९ पैकी १४ जागा मिळवून कॉंग्रेसने सत्ता मिळवली तर भाजपला केवळ ५ जागा जिंकता आल्या./पण आता या नगरपालिकेचा कार्यकाल संपला आहे. दुसरी पंचवार्षिक निवडणूक होईपर्यंत पालिकेवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.आता लवकरच प्रशासकांची निवड केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी प्रताप कोळी यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top