कसबाच्या जागेवरून मविआमध्ये तिढा

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. या जागेवर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केले आहे. धंगेकराच्या उमेदवारीवरून स्वपक्षातूनच विरोध होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागूल यांनी धंगेकर यांना उघड विरोध केला आहे. त्यातच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटही आक्रमक झाला असून कसबा विधानसभेची जागा आम्हाला देण्याची लेखी हमी दिली तरच आम्ही धंगेकर यांचा प्रचार करू अशी भूमिका ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे पुण्यात काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. बुधवारी रात्री पुण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी अत्यंत आक्रमकपणे ही भूमिका मांडली. एकीकडे स्वपक्षातून विरोध असताना ठाकरे गटही आक्रमक झाल्याने काँग्रेस कात्रीत सापडली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top