कारवाईच्या भीतीने धारबांदोडा तालुक्यात चिरेखाणी बुजवणे सुरू

पणजी- दक्षिण गोवा जिल्ह्यातील धारबांदोडा तालुक्यात काही दिवसांपासून कारवाईच्या भीतीने बंद केलेल्या बेकायदेशीर चिरेखाणी आता माती टाकून बुजविण्यास सुरुवात झाली आहे.

या आठवड्यात खाण खात्यातर्फे तालुक्यातील चिरेखाणींची तपासणी केली जाण्याची शक्यता असल्याने बेकायदेशीर खाण मालकांची तारांबळ उडाली आहे.कारवाईपासून बचाव करण्यासाठी अनेकांनी मशीनरीसह चिरेखाणीत वापरण्यात येणारे जनरेटर लपवून ठेवले आहेत.तसेच सध्या माती टाकून चिरेखाणी बुजविण्यास सुरुवात केली आहे. चिरेखाणीतून अधिक चिऱ्यांची वाहतूक करण्यासाठी सर्व मालक एकमेकांशी स्पर्धा करू लागले होते.त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिरेखाणी सुरू झाल्या होत्या. रात्रीच्यावेळी चिरे काढण्यासाठी खास जनरेटरची व्यवस्था प्रत्येक चिरेखाणीवर दिसत होती. आता चिरेखाणी बंद झाल्या तरी हा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी राजकीय आश्रय घेण्यास सुरुवात झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top