मुंबई – अभिनेता प्रवीण डब्बास आज मुंबईत एका कार अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईच्या होली फॅमिली रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.आज सकाळी कार चालवत असताना प्रवीणचा अपघात झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असून डॉक्टर त्याच्यावर उपचार करत असल्याची माहिती त्याची पत्नी अभिनेत्री प्रिती जांगियानी हिने दिली आहे. प्रवीण डब्बासने खोसला का घोसला, मान नेम इज खानसारख्या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्याने ५० हून अधिक चित्रपट व वेब सिरीजमध्ये काम केले आहे. प्रो पंजा लीगचा तो प्रवर्तक होता. तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन प्रो पंजा लीगच्या सदस्यांनीही केले आहे.
