Home / News / किम जोंगने पावसात भिजतपूर स्थितीची पाहणी केली

किम जोंगने पावसात भिजतपूर स्थितीची पाहणी केली

प्योंगयांग – उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन याने देशातील गंभीर पूरस्थितीचा पावसात भिजत आढावा घेतला.उधाण आलेल्या समुद्रात किमने बोटीतून...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

प्योंगयांग – उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन याने देशातील गंभीर पूरस्थितीचा पावसात भिजत आढावा घेतला.उधाण आलेल्या समुद्रात किमने बोटीतून पूरस्थितीची पाहणी केली.किमचे हे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.फोटोमध्ये किम काही अधिकाऱ्यांसह बोटीतून पाहणी करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये भर पावसात खुर्चीत बसून किम अधिकाऱ्यांशी चर्चा करताना दिसत आहे. मुसळधार पाऊस, चक्रीवादळ आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी पुरेशी सज्जता न बाळगल्याबद्दल किमने अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच बचाव पथकांनी सुमारे ५ हजार लोकांचे प्राण वाचवले,असा दावाही केला.

Web Title:
संबंधित बातम्या