कुणबी पुराव्यांसाठी मराठ्यांनी २५० वर्षांपूर्वीची भांडी आणली!

छत्रपती संभाजीनगर- मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या पडताळणीसाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ही शिंदे समिती कालपासून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन निजामकालीन आणि त्यापूर्वीचे पुरावे तपासत आहे. काल छत्रपती संभाजी नगरमधल्या विभागीय आयुक्त कार्यालयात मराठा पंचकमिटी बेगमपुरा यांच्याकडून २०० ते २५० वर्षांपूर्वीची तांबा-पितळेची भांडी समितीला पुरावे म्हणून दाखवण्यात आली. या भांड्यांवर कुणबी असल्याच्या नोंदी आहेत, असा दावा करण्यात येत आहे.
मराठा पंचकमिटी बेमगपुरा यांच्यावतीने आंदोलकांनी सांगितले की, आमच्याकडे अत्यंत पुरातन भांडी आहेत. या भांड्यावर कुणबी, अशा नोंदी आहेत. लग्न समारंभ आणि भंडाऱ्याच्या कार्यक्रमात कुणबी समाजाकडून या भांड्यांचा वापर होत असे. २०१८ मध्ये आलेल्या गायकवाड समितीसमोर देखील हीच भांडी ठेवण्यात आली होती. परंतु हे पुरावे ग्राह्य धरले नाहीत. शिंदे समिती ही भांडी आणि त्यावरील वेगवेगळ्या भाषेतील नोंदी पुरावे म्हणून ग्राह्य धरणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top