कुस्तीपटू विनेश फोगटने पुरस्कार कर्तव्यपथावर ठेवले

नवी दिल्ली – कुस्तीपटू बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत केल्यानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगटनेही पुरस्कार परत केले आहेत. कुस्तीपटू विनेश फोगट खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार पंतप्रधान कार्यालयाला परत देण्यासाठी निघाली होती. मात्र तिला वाटेतच पोलिसांनी रोखले, त्यामुळे विनेशने नाईलाजाने कर्तव्यपथावरच आपले पुरस्कार ठेवले. कुस्तीपटू बजरंग पुनियाने या घटनेचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया साईटवर अपलोड केला आहे. “हा दिवस कोणत्याही खेळाडूच्या जीवनात येऊ नये. देशाच्या महिला मल्ल सर्वात अवघड परिस्थितीतून जात आहेत”, असा मजकूर बजरंग पुनियाने लिहिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top