कॅनडातील माध्यम कंपन्यांना गुगल वर्षाला ६१२ कोटी देणार

टेक कंपन्यांची मनमानी बंद

ओटावा :

कॅनडामध्ये गुगलने माध्यम कंपन्यांचा कंटेंट वापरण्याच्या बदल्यात त्यांना पेमेंट करण्याचे मान्य केले आहे. याबाबत कॅनडा सरकार आणि गुगल यांच्यात बुधवारी करार झाला. करारानुसार, स्वतंत्र आऊटलेट, सरकारी माध्यमे आणि बहुभाषिक माध्यमांसह वृत्तपत्र संघटनांना गुगल वर्षाला सुमारे ६१२ कोटी रुपये देणार आहे.

कॅनडा सरकारने म्हटले आहे की, ‘ही रक्कम प्रत्येक पात्र माध्यम आऊटलेटमध्ये कार्यरत कर्मचारी संख्येच्या आधारे वितरित केली जाईल. ही रक्कम अंदाजापेक्षा खूप कमी आहे.’ संसदीय अर्थसंकल्पीय अहवालात म्हटले होते की, माध्यम कंपन्या नव्या फंडात (गुगल व मेटा) एकूण २ हजार कोटी रुपये मिळवण्याची अपेक्षा ठेवू शकतात.’ तथापि, मेटा कंपनीसोबत कॅनडा सरकारची चर्चा थांबली आहे. यावर पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले, दुर्दैवाने मेटा लोकशाही संस्था आणि त्यांच्या स्थैर्याबद्दल जबाबदारी घेण्याचे टाळत आहे. यावर कॅनडाचे मंत्री पास्कल सेंट-ओंज म्हणाले, जगात कुठेही करार झाला तर कॅनडाला यावर वाटाघाटीचा अधिकार असेल. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया व जर्मनीने गुगलसोबत असे करार केले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top