Home / News / केजरीवलांची याचिका फेटाळली! हायकोर्टाचा लवकर सुनावणीस नकार

केजरीवलांची याचिका फेटाळली! हायकोर्टाचा लवकर सुनावणीस नकार

दिल्ली – मद्य धोरण घोटाळ्यातील आरोपी असलेले अरविंद केजरीवाल सध्या जामिनावर बाहेर आहेत. ईडीने त्यांना २१ मार्च रोजी मद्य धोरण...

By: E-Paper Navakal

दिल्ली – मद्य धोरण घोटाळ्यातील आरोपी असलेले अरविंद केजरीवाल सध्या जामिनावर बाहेर आहेत. ईडीने त्यांना २१ मार्च रोजी मद्य धोरण प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर २६ जून रोजी सीबीआयने त्यांना तुरुंगातून ताब्यात घेतले. दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणावर लवकर सुनावणी करण्यास नकार दिला.
केजरीवाल यांनी सुनावणी २० डिसेंबरच्या नियोजित तारखेपूर्वी करण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यांची याचिका फेटाळण्यात आली. न्यायमूर्ती मनोज कुमार ओहरी म्हणाले की, नियोजित तारखेलाच सुनावणी होईल.आम्हाला अजून बरीच प्रकरणे ऐकायची आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या