केरळात पावसाचा रेड अलर्ट आपत्ती व्यवस्थापन दल सज्ज

तिरुअनंतपुरम
केरळमध्ये दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने येत्या दोन दिवसात केरळ मध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. केरळमध्ये आपत्ती व्यवस्थापन दल सज्ज झाले असून सर्व सरकारी रुग्णालयांनाही सज्ज राहण्याच्या सूचना केरळ सरकारने दिल्या आहेत. पथानामथिट्टा, कोट्टायम, इडुक्की जिल्ह्यांना हे रेड अलर्ट देण्यात आला आहे. तिरुवनंतपुरम, कोल्लम, अलप्पुझा, एर्नाकुलम,त्रिशुर, पलक्कड, मल्लपुरम आणि कोझीकोड जिल्ह्यांना अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे भुस्खलनाचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा व तालुका कार्यालयांमध्ये आपत्ती निवारण कक्ष उघडण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील लोकांनाही सतर्क राहण्याच्या व अनावश्यक प्रवास टाळण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top