कॉंगो देशाच्या पंतप्रधानपदी पहिल्यांदाच महिलेची नियुक्ती

किन्शासा- आफ्रिकेतील कॉंगो देशात पंतप्रधानपदी प्रथमच एका महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्ष फेलिक्स शिन्सेकेडी यांनी निवडणुकीदरम्यान तसे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार देशाच्या माजी नियोजन मंत्री जुडिथ सुमिन्वा तुलुका यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

देशातील खाण उद्योगावरील वर्चस्वातून सुरू झालेला हिंसाचार सध्या भीषण पातळीवर पोचला आहे. विशेषतः रवांडाच्या सीमेवरील हिंसाचारामुळे आतापर्यंत ७० लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.हा हिंसाचार थांबवण्याचे मोठे आव्हान तुलुका यांच्या समोर असणार आहे.कॉंगोच्या बहुतांश भूभागावर जवळपास १२० सशस्त्र गटांचे वर्चस्व राहिले आहे. संयुक्त राष्ट्राच्या शांतिसैनिकांनी हिंसाचार थांबवण्यासाठी काहीही केले नसल्याने या गटांना देशातून निघून जाण्यास सांगण्यात आले आहे.आता देशाच्या सुरक्षा आणि शांतता प्रस्थापनेचे मोठे आव्हान तुलुका यांच्या समोर असणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top