कोयनेचे सहाही वक्री दरवाजे ७ फुटांवर स्थिर

कराड- पाटणसह कराड तालुका आणि सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतील महापुराची स्थिती लक्षात घेता कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग न वाढविता धरणाचे सहाही वक्री दरवाजे सात फुटांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे.

सध्या कोयना धरणातून एकूण ३२,१०० क्युसेक पाणी पूर्वेकडील कोयना नदी पात्रात सोडण्यात येत आहे.याच पाण्यावर पायथा वीजग्रहातील २० मेगावॉट क्षमतेच्या दोन्ही जनित्राद्वारे ४० मेगावॉट वीजनिर्मिती केली जात आहे.कोयना धरणांतर्गत येणार्‍या पाणलोट क्षेत्रातील कोयना,
नवजा आणि महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर दोन दिवसांपासुन काहीसा कमी झाला आहे.तरीही पूरस्थितीचा अंदाज घेऊनच कोयना धरणाचे सहाही दरवाजे सात फुटांवर स्थिर ठेवले आहेत.

Share:

More Posts