कोल्हापूरच्या अंबाबाईला तिरुपती देवस्थानाकडून मानाचा शालू अर्पण

कोल्हापूर

नवरात्रौत्सवात तिरुपती देवस्थाकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू अर्पण करण्यात येतो. यंदाही या प्रथेचे पालन करत आज तिरुपती देवस्थानचे पदाधिकारी, महाराष्ट्राचे देवस्थान प्रतिनिधी मिलिंद नार्वेकर शालू घेऊन सकाळी १० वाजता अंबाबाई मंदिरात दाखल झाले. देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी हा शालू स्वीकारला. या केशरी रंगाच्या शालूला सोनेरी काठ पदर आहे. त्याची किंमत १,०६,५७५ रुपये आहे.

तिरुपतीवरून करवीर निवासिनी अंबाबाईला प्रतिवर्षी मानाचा शालू पाठवण्याची प्रथा आहे. त्यानुसार यंदाही हा मनाचा तिरुपतीवरून आलेला मानाचा शालू आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, धनाजी जाधव, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नर्लेकर उपस्थित होते. पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे हा सोहळा पार पडला. त्यानंतर आई अंबाबाईला हा शालू अर्पण करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top