Home / News / कोहलीचा अलिबागमध्ये 30 कोटींचा अलिशान बंगला

कोहलीचा अलिबागमध्ये 30 कोटींचा अलिशान बंगला

अलिबाग – भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीचा अलिबागमधील आलिशान बंगला तयार झाला आहे. या बंगल्याची किंमत 30 कोटी रुपये आहे.कोहलीने त्याच्या...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

अलिबाग – भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीचा अलिबागमधील आलिशान बंगला तयार झाला आहे. या बंगल्याची किंमत 30 कोटी रुपये आहे.कोहलीने त्याच्या सोशलमीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करून बंगल्याची झलक दाखवताना स्वप्नातील घर तयार झाल्याचे म्हटले आहे.विराटच्या आलिशान बंगल्यात स्विमिंग पूल, एक विस्तीर्ण गार्डन आणि इतर अनेक सोयीसुविधा आहेत. घरातील लिव्हिंग रूम आणि तिथून बाहेर पडण्याचा मार्ग सर्वात जास्त आवडल्याचे त्याने म्हटले आहे. अलिबागमध्ये स्वत:चा बंगला बांधण्याचा प्रवास हा एक अविस्मरणीय अनुभव होता. आमच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणल्याबद्दल संपूर्ण टीमचे खूप खूप आभार. माझ्या प्रियजनांसोबत येथे प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी मी आतुर आहे, असे तो पुढे म्हणाला आहे.विराटच्या नव्या बंगल्याची किंमत 30 कोटी रुपयांच्या घरात आहे. त्याने 19-20 कोटी रुपयांना जमीन खरेदी केली. बांधकामासाठी 13 कोटी रुपये खर्च आला आहे. हा बंगला आवास कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला असून तो 2 वर्षांत पूर्ण झाला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या